ठाकरेंची गडकरींना ऑफर
उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण, भाजपचे नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
या परिवाराची जबाबदारी कोण घेणार?
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंबं माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती. आता यांनी मोदी का परीवार सुरू केलं आहे. तुमचं परीवार ठीक आहे, पण या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मी मुख्यमंत्री नाही हे मला माहित आहे. पण काही गद्दार म्हणतात हे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. ओमराजे आणि कैलास यांचे कौतुक. कारण त्यांना देखील लालच दाखविण्याचा प्रयत्न झाला होता, हे खरे शिवसैनिक आहेत. आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही. शिवसेना भाजपला संपवून मुठमाती करेल.
वाचा - रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत रस्सीखेच; कोणाचं पारडं जास्त जड?
स्वतःच्या बापाचा फोटो वापरा : ठाकरे
अमित शहा मणिपूरला जात नाहीत तिकडे शेपुट घालतात आणि इथे मोठ बोलतात. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा आणि भाजप पक्ष वाढावा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो, स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून राजकरण करून दाखवा, आमच्या वडिलांचे फोटो का लावता? अशी टीका ठाकरेंनी केली. ठाकरे पुढे म्हणाले, की काँग्रेसने फक्त 600 कोटी जमवले सत्तेत असताना. पण भाजपने काही वर्षातच सात आठ हजार कोटी जमवले. मग लुटले कोणी? जाहिरातीसाठी 84 कोटी खर्च केले आणि काय बघायचे तर त्यांचे दाढीवाले फोटो? आम्ही कामे केली पण जाहिराती केल्या नाहीत.