मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे, मराठा समाजाला सरसकट आरक्षण ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. मात्र तरी देखील त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरूच आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक खालावली, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सभा संपताच डॉक्टरांकडून त्यांचं चेकअप करण्यात आलं. तब्येत खालवल्यानं जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया देणं देखील शक्य झालं नाही. ते दोन व्यक्तींचा आधार घेऊन गाडीत बसले.
advertisement
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची शुगर कमी झाली आहे. शुगर 76 वर पोहोचली आहे. सलग उपोषण व प्रवास सुरू असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांनी आता पुढील पाच दिवस आराम करावा अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी त्यांच्या चेकअपनंतर दिली आहे.