आषाढी वारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने दिलेले अल्टिमेटम संपताच बैठक घेऊन पुढची दिशा ठरवू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सरकारसोबत रोजच बोलणी होतात, मात्र आरक्षणाच्या विषयात महत्त्वाचं काहीच नाही. सरकारने आम्हाला दिलेलं 10 टक्के आरक्षण 27 टक्के ओबीसी आरक्षणात घेऊन ओबीसी आरक्षण वाढवावं, सत्ताधारी आणि विरोधक मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, हे आता आम्ही ओळखलं आहे. सगळे मंत्री व विरोधी आमदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अधिवेशनात विषय लाऊन धरावा, अन्यथा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिंदे समितीला पुरावे मिळाले ती चांगली गोष्ट आहे, याबाबत शंभूराजे देसाई व राज्य सरकारचे नेते सांगतील, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement