नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
'गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी भवाणीला साकडे घातले आहे. सरकार मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला नाही म्हणून आम्ही अधिक ताकतीनं लढू. सगळ्या राजकीय पक्षाने भूमिका घ्यावी आणि सांगावे मराठ्यांना कुणबीमध्ये आरक्षण द्यावे. विरोधी पक्षानं देखील भूमिका घ्यावी. आमचं इतर समाजासोबत बोलणं सुरू आहे, आघाडी होणार नाही' असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'राज ठाकरे शब्दांचा खेळ करीत आहेत, आरक्षण आणि रोजगाराचा विषय वेगवेगळा आहे. राज ठाकरे यांनी पळवाट शोधली. ते फोन करणार नाहीत भेट घेणार नाहीत. श्रीमंत लोकांना आरक्षणाची झळ माहीत नाही. हे श्रीमंत आमच्यामुळे झाले आहेत. राणे यांना मी मराठवाड्यात येऊ नका असं म्हटलो नाही. हे उगाच माझ्या अंगावर येऊ लागले आहेत. जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत, सरकारचं हे षडयंत्र आहे. मुलींना मोफत शिक्षण म्हणतात आणि पुण्यात मात्र मुलींकडून 85 हजार फिस घेतली जाते,' असा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.