काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे धाराशिव येथे बोलताना म्हणाले, "ज्या पद्धतीमध्ये अधिवेशनात ओबीसी समाजाचे नेते एकत्र येऊन मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, त्याच पद्धतीने मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. समाजाचे नेते एकत्र येत नाही, हेच आमचे दुर्दैव असल्याचं सांगत उद्या मी बीड जिल्ह्यात जात आहे. मात्र, मला आणि मराठा समाजाला पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचा विरोध करण्याचे काहीच कारण नाही. तरीदेखील ते विरोध करत आहेत. त्यांना मराठा समाजाने मत दिली आहेत, मग का विरोध करतात? असा सवाल मनोज जरांगे यांनी मुंडे बहीण भावांना विचारला आहे. तसेच येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील सोडवणार असून सरकारने विधानसभेपर्यंत शहाण व्हावं असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
advertisement
वाचा - मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टातून मोठी बातमी; मागासवर्ग आयोगाची ती विनंती मान्य
बीडमध्ये शांतता मोर्चा
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती उद्या बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात सरकारला दिलेल्या अल्टीमेटम 13 तारखेला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. सुभाष रोडमार्गे अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ही रॅली येणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांना संबोधित करतील. या रॅलीच्या अनुषंगाने मराठा समन्वयकांनी पार्किंग, ॲम्बुलन्स, नाष्टा, पाणी याची व्यवस्था केली आहे. तसेच स्वयंसेवकांची देखील नियुक्ती केली आहे. यात महिला स्वयंसेवकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.