धाराशीवमध्ये खासदार ओमराजें विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी आहे. मात्र ओमराजेंनी केंद्र सरकारनं ५० टक्के मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजेंच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
advertisement
ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असुन केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी न्यूज 18 लोकमत ला बोलताना केली होती. ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारले. ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे यांनी देखील काल याच मागणीवरन ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागणी कळत नसेल तर गप्प बसावं अशी टीका केली होती.