मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील धनगर समाजाच्या आंदोलक बांधवांशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, आंदोलकानी तब्येतीची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. प्रत्येक सरकारने आम्हाला फसविले त्यामुळे आम्ही शेवटचा लढा म्हणून आमरण उपोषणाला बसलो असल्याचे आंदोलकांनी जरांगे पाटील यांना यावेळी सांगितले. जरांगे यांच्याशी संवाद साधताना तरुण चांगलेच भावूक झाले होते, तब्येतीची काळजी घ्या असे ते एकमेकांना म्हणाले.
advertisement
धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे तीन तरुण गेल्या तीन दिवसापासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाचा आज 4 था दिवस आहे.दरम्यान तुमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी कोणी आले होते का ? असे जरांगे यांनी आंदोलकांना विचारले. त्यावर प्रशासन आल्याचे त्यांनी सांगितले, मात्र त्यांनी उद्रेक होईपर्यंत अंत पाहू नये असेही ते यावेळी म्हणाले.आंदोलकांनी जरांगे यांना धाराशिव येथील आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली त्यावर जरांगे पाटील यांनी सांगितले की मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. मी पुन्हा आमरण उपोषण सुरु करीत आहे, त्यामुळे मी नाही आलो तरी सोबत आहे, मी तुमचा विषय लावून धरेल असं अश्वासन या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी दिलं आहे.