TRENDING:

Dharashiv : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाली; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला अहवाल

Last Updated:

धाराशिवमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, धाराशिव, 04 सप्टेंबर : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी मराठा समाज आणि संघटना रस्त्यावर उतरल्या असून आक्रमक झाल्या आहेत. लाठीचार्जच्या घटनेचा निषेध केला जात आहेत. दरम्यान, धाराशिवमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. या संदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ११४ पानांचा लेखी अहवाल सादर केला आहे.
News18
News18
advertisement

मराठी कुणबी असल्याच्या कागदपत्रांसह हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलाय. धाराशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. गाव नमुना 14 मध्ये 89 ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. या नोंदीचे पुरावे राज्य सरकारकडे सादर केले आहेत. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले असून आज 4 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे.

advertisement

फडणवीस म्हणतात राजकारण करू नका; ते जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? जालन्यातून राज ठाकरेंचा खोचक टोला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

धारशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. गाव नमुना 14 मध्ये 89 ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी आढळून आले आहेत. या नोंदीचे पुरावे राज्य सरकारकडे सादर केले असून यात जन्म मृत्यू नोंद, खासरा पहाणी व इतर महत्त्वाच्या महसुली कागदपत्रावर मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आढळून आला  आहे. तो अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाली; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला अहवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल