फडणवीस म्हणतात राजकारण करू नका; ते जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? जालन्यातून राज ठाकरेंचा खोचक टोला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जालना दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली.
जालना, 4 सप्टेंबर : आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जालना दौऱ्यावर आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सोबतच शांततेच आवाहनही केलं. मराठा आरक्षण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. कायदेशीर बाजू समजून घ्या असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले राजकारण करू नका, जे जर विरोधात असते तर काय केलं असतं असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलतना ते म्हणाले की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही हे आधीच मी सांगितलं होतं. कायदेशीर बाजू समजून घ्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात आहे. मी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मला या नेत्यांसारखं खोट बोलता येत नाही. मात्र सत्तेत आल्यावर त्यांना तुमचा विसर पडतो. ज्यांनी तुमच्यावर लाठीचार्ज केला त्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
जालन्यात जमावबंदी
दरम्यान जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून, जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून जालना जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
September 04, 2023 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
फडणवीस म्हणतात राजकारण करू नका; ते जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? जालन्यातून राज ठाकरेंचा खोचक टोला