दुसरीकडे धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान देखील मराठा आंदोलकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी तुम्ही सरकारला जाब विचार अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली. तसेच आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील दिलं.
advertisement
दरम्यान ढोकीमध्ये उद्धव ठाकरे यांची गाडी आडवण्यात आली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.सर्वपक्षीय नेत्यांनी गावात येऊ नये, जरांगे पाटील यांना पाठिंबा, ढोकी गावातून 10 उमेदवार लोकसभेला उभे राहणार अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर असून, त्यांचं शिवसैनिकांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात येत आहे.