हा तरुण आपल्यासोबतच आपले आई-वडील आणि पत्नी असे चार लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणार आहे. अमोल जाधव असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आपल्या मालकीचे साडेतीन टन सोयाबीन शासकीय गोदामात तारण ठेवलं आहे. त्याने सोयाबीन तारण ठेवून एक लाखाची उचल घेतली आहे, याच पैशांमधून तो आता आपले आई-वडील, पत्नी आणि स्वत: चा उमेदवारी अर्ज भरणार आहे.
advertisement
कुटुंबातील एकूण चार सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं अमोल जाधव यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारने आतापर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली आहे, आता या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करून, एक आगळे वेगळे आंदोलन करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातून 1000 मराठा आंदोलकांनी उमेदवार अर्ज भरण्याची तयारी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
March 23, 2024 7:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maratha Reservation : मराठा तरुणानं लोकसभेच्या उमेदवारीसाठी सोयाबीन ठेवलं तारण, स्वत:सह आई-वडील अन् पत्नीचा भरणार अर्ज