याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमरगा इथं गणेश गोविंद माने यांचं आर्या मेडिकल आहे. या ठिकाणी झोपेचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय दिलं जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. अन्न आणि औध प्रशासनाने मेडिकलची चौकशी केली असता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या औषधांची विक्री केली जात असल्याचं समोर आलं. तसंच अशा गोळ्यांचा जवळपास दीड लाख रुपयांचा साठासुद्धा मे़डिकलमध्ये आढळला आहे.
advertisement
Nashik : तुम्हीच काम करता का? राजीनामा देईना म्हणून महिला सरपंचाला मारहाण, VIDEO VIRAL
मेडिकलमधून झोपेचं औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणाला विकण्यात आलं याचं रेकॉर्ड पोलिसांना सापडडलेलं नाही. मेडिकलमधून अशा तब्बल १९ हजार गोळ्यांची विक्री झाली असून ती नेमकी कोणाला झाली? शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशेसाठी तर गोळ्यांची विक्री केली नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.
गोळ्या सोलापूर व कर्नाटक राज्यातून आल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या गोळ्याची नेमकी विक्री कोणी केली याचे रेकॉर्ड मात्र हाती लागलेले नसून या प्रकरणात आता उमरगा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास धाराशिव पोलीस करत आहेत या गोळ्या नेमक्या बालकासह तरुणाईनं वेळ लावलं असून याचा वापर यासाठी झाला आहे का याचाही तपास अन्न व औषध प्रशासन करत असून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये असं आव्हान ही अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केल आहे