Nashik : तुम्हीच काम करता का? राजीनामा देईना म्हणून महिला सरपंचाला मारहाण, VIDEO VIRAL

Last Updated:

एका महिला सदस्याने कार्यालयात येऊन महिला सरपंचाला मारहाण केल्याचा प्रकार नाशिकरोड इथल्या पळसे ग्रामपंचायतीत घडला आहे.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 18 सप्टेंबर : ग्राम पंचायत निवडणुकीत निकालानंतर कमी जागा मिळालेल्या पॅनेलने दुसऱ्या पॅनेलमधील सदस्यांच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली. पण पहिल्या सरपंचाने राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या सरपंचाने राजीनामा द्यावा अशी मागणी करत एका महिला सदस्याने कार्यालयात येऊन महिला सरपंचाला मारहाण केल्याचा प्रकार नाशिकरोड इथल्या पळसे ग्रामपंचायतीत घडला आहे. राजीनामा देण्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असून या प्रकरण महिला सरपंचाने नाशिक रोड पोलिसात तक्रार दाखल केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अडीच वर्षापूर्वी पळसे ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विष्णू गायखे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विकास पॅनलने पाच जागा जिंकल्या. राजकीय खलबते होऊन परिवर्तन पॅनलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई होणाजी गायधनी यासह तीन सदस्यांनी विकास पॅनलला समर्थन दिलं. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला.17 पैकी 10 जागा विकास पॅनलकडे असल्यामुळे पहिल्या आठ महिन्याकरिता सुरेखा गायधनी या सरपंच पदी विराजमान झाल्या. त्यानंतर प्रिया दिलीप गायधनी यांची सदस्यांनी सरपंच पदी निवड केली. प्रिया गायधनी गावचा कारभार सांभळत असतानाच त्यांच्या राजीनाम्याची मागणी ताराबाई गायधनी यांच्याकडून होऊ लागली.
advertisement
सरपंच प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना सोमवारी सकाळी महिला सदस्य ताराबाई होणाजी गायधनी यांनी कार्यालयात आल्या. यावेळी "तुम्ही राजीनामा द्या" या कारणावरून वाद घालीत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली. ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. काही ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
महिला सरपंचाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात ताराबाई यांनी महिला सरपंच प्रिया गायधनी यांच्या गळ्याला धरल्याचं दिसतं. तसंच यावेळी तुम्हीच फक्त कामं करता का? दुसरं कोणी करत नाही का अशी विचारणाही केली. यावेळी अडवण्यासाठी गेलेल्यांनाही ताराबाई यांनी कोणाला घेऊन यायचं ते या असं म्हटलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : तुम्हीच काम करता का? राजीनामा देईना म्हणून महिला सरपंचाला मारहाण, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement