Pimpri Chinchwad : काकाच्या बालेकिल्ल्यात पुतण्या रोहित पवारांचं शक्तीप्रदर्शन; अजितदादा गट म्हणाले...

Last Updated:

Pimpri Chinchwad : पिंपर चिंचवडमध्ये रोहित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काकाच्या बालेकिल्ल्यात पुतण्या रोहित पवारांचं शक्तीप्रदर्शन
काकाच्या बालेकिल्ल्यात पुतण्या रोहित पवारांचं शक्तीप्रदर्शन
पिंपरी चिंचवड, 18 सप्टेंबर (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार समोरासमोर आले. हाच संघर्ष आता आणखी एका काकापुतण्यात होताना दिसत आहे. राष्ट्रवादीतील काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आता रोहित पवारांनी थेट अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शड्डू ठोकला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यात निर्माण झालेला आणखी एक संघर्ष पाहायला मिळणार आहे.
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवार
एकेकाळी राष्ट्रवादीचा अभ्यद्य गड आणि अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये येऊन रोहित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं आहे. रोहित पवारांनी आपले दंड थोपटत, कोणत्याही परिस्थितीत आपण शरद पवारांच्या विचारांवर आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. अर्थातच त्यांच्या आव्हान देण्याचा रोख होता तो अजित पवारांकडे.
advertisement
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तब्बल तीन महिन्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा शहर अध्यक्ष निवडण्यात आला. आता शरद पवारांच्या गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे हे तरुण नेतृत्व असेल. मात्र, तुषार कामठे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना आपल्याकडे वळवून पुतण्या रोहित पवारांनी काका अजित पवारांना शह दिल्ल्याच बोलल जात आहे. मात्र, रोहित पवार आज जे प्रयत्न करतायत ते स्वाभाविक असल्याचं सांगत निवडणुका बाबतीत अजून बरच पाणी पुलाखालून जायचं बाकी आहे असं म्हणत अजित पवार समर्थकांनी रोहित पवारांच्या आव्हानाला काडीचेही महत्व दिले नाही.
advertisement
असं जरी असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये काका-पुतण्यातील हा संघर्ष पेटणार हे निश्चित मानलं जातंय. कारण आपल्या विचाराशी प्रतारणा करून भाजपशी सलगी करणाऱ्या अजित पवार यांना शह देण्यासाठी थेट शरद पवार यांनीच रोहित पवार यांना पाठबळ दिल्याचं जाणकारांच म्हणण आहे. त्यामुळेच आगामी काळात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला तर नवल वाटायला नको.
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad : काकाच्या बालेकिल्ल्यात पुतण्या रोहित पवारांचं शक्तीप्रदर्शन; अजितदादा गट म्हणाले...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement