नेमकं काय म्हणाले राणे?
मराठा समाजाच्या उमेदवारीनं कुठलाच फरक पडणार नाही, सगळ्यात जास्त मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. स्वतः मी 96 कुळी मराठा भारतीय जनता पार्टीसोबत आहे. मराठा समाजाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे एक तर ते उमेदवार उभे करणार नाहीत किंवा केल तरी फरक पडणार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला राज्यासह देशाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं मी आई तुळजाभवानीला घातलं आहे. पुन्हा एकदा मला मंत्रिपद मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वात 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Location :
First Published :
Mar 25, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Narayan Rane : मनोज जरांगेंचं इलेक्शन ‘प्लॅनिंग’, नारायण राणेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…
