2019 राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य व पवारांचे जवळचे विश्वासू अजित दादांचे मेहुणे डॉ पदमसिंह पाटील व राणा पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला. आता हा प्रवेश अजित पवारांनी घेण्यासाठी सांगितलं होतं अगोदर आम्हाला पाठवले व नंतर अजित दादा भारतीय जनता पार्टी सोबत आले. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भारतीय जनता पार्टी व हातात धनुष्यबाण असल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केला आहे. मल्हार पाटील यांच्या या गौप्यस्फोटाने राजकारणात चांगलीच खळबळ माजली.
advertisement
मल्हार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर ठाकरे गटाचे खासदार तथा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले. 2019 पासुनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालु होते का? याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी स्वतः द्यावे असा प्रश्न देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थितीत करत अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मी महायुतीची उमेदवार आहे. मी राष्ट्रवादी कशाला वाढवू असे वक्तव्य उमेदवार अर्चना पाटील यांनी केले होते. त्यानंतर आता 2019 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जायला लावल्याचं सांगत मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र मायलेकांच्या या दोन्ही वक्तव्यांनी राष्ट्रवादी व अजित पवार यांची कोंडी झाली आहे. आता या गौप्यस्फोटानंतर अजित दादा याला काय प्रत्युत्तर देतात याकडे देखील लक्ष लागले आहे.