नेमकं काय घडलं?
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर जाऊन मराठा तरुणांनी आंदोलन केलं. 5 तासानंतरही आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर चढलेले तरुण खाली उतरण्यास तयार नव्हते. मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा विषय मिटवल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. महसूल व पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे स्वतः खाली उतरून आंदोलकाशी चर्चा केली.
advertisement
आंदोलन अखेर मागे
धाराशिव पाच तासानंतर ही आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गच्चीवर चढलेले तरुण खाली उतरले. मनोज जरांगे पाटील यांच्या फोननंतर मराठा तरुणांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. धारशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी या तरुणांना खाली उतरवण्यासाठी मध्यस्थी केली. शेवटी मनोज जरांगे यांना फोन लावून देण्यात आला. जरांगे यांनी तुम्ही हे आंदोलन माघे घ्या व अंतरवली सारटी येथे भेटण्यासाठी या पुढील चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर हे तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गच्चीवरून खाली उतरले आहेत. गेल्या पाच तासापासून हे तरुण वरी चढले होते. हे तरुण खाली उतरल्यानंतर जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांनी सुटकेचा निस्वास टाकला आहे.
वाचा - देवा तू इतका निष्ठूर कसा! वादळात छप्परासह लेक हवेत उडून गेली, 200 फुटांवर सापडला मृतदेह
जरांगे यांनी उपचार घेतले
सरकारच्या शब्दाला मान देऊन मी सलाईन लावली आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा सलाईन काढली जाईल. समजासाठी मी मरेपर्यंत लढणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. अंतरवाली सराटी गावात जास्त गर्दी करु नका, असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय तडीस गेल्याशिवाय मी मागे हटणार नव्हतो. काल शुगर कमी झाल्याचं डॉक्टर म्हणत होते,विषय तडीस नेतो म्हणून सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुोले सलाईन लावली, त्यांनी तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढता येईल, असे मनोज जरांगे म्हणाले.