नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
अजितदादा पवार साहेबांसोबत होते तेव्हा आदेश देत होते, आता त्यांना दिल्लीवाल्यांचा आदेश ऐकावा लागतोय .त्यांच्याच आदेशानुसार ते सध्या काम करत आहेत. त्यांना सांगितलं उमेदवारी अर्ज दाखल करा ते करतील त्यांना सांगितलं उमेदवारी अर्ज काढून घ्या तर ते उमेदवारी अर्ज काढून घेतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते तुळाजापूरमध्ये बोलत होते.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार राणा पाटील व अर्चना पाटील कुटुंबीयांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. रक्ताच्या नात्यातील लोक चुकीच्या विचारांसोबत गेली. आम्ही विचार जपणारी लोक आहोत, त्यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी रक्ताच्या नात्यांविरोधातही लढा देणारच असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मी याच चुकीच्या विचारांच्या लोकांचा विरोध करण्यासाठीच ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज धाराशिव येथे आलो आहे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन पुढील कार्यास सुरुवात केली आहे. राज्यात आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने लवकरच बदल होईल असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं.