नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'भाजपनं आपल्या पाठीत वार केलाच, अमित शाह यांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा केला. तुळजा भवानाची शपथ घेतो शाहांनी शब्द दिला होता, मात्र त्यांनी दगा केला. मीही बाळासाहेबांना वचन दिलं होतं.' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजातील प्रश्नांबद्दल भाजपचे मंत्री मोदींसमोर कधीच बोलत नाहीत, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचं नामांतर कोणी केलं हे केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती नाही. दहा वर्ष सत्तेत होते, मग तेव्हाच नामांतर का केलं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मणिपूर प्रकरणावरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडानं द्यायच्या, मणिपूरमधील महिलांवर कोणी बोलत नाही, महिलांनी आता कालीमातेचं रूप घ्यायला पाहिजे. आमच्या संघर्षाला महिला शक्तीचा आशीर्वाद पाहिजे. आपलं सरकार येणार, आम्ही दिल्लीत आपलं सरकार आणणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.