ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आले असताना देवानंद रोचकरी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर अवघ्या 24 तासांत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांची घरवापसी झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे.
देवानंद रोचकरी यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानं तुळजापूरमध्ये ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर असताना रोचकरी यांनी शिवसेनेची साथ सोडत आपल्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र उद्धव ठाकरे दौरा आटपून मागे फिरताच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश झाला.
advertisement
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
May 06, 2024 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच नेत्याची अवघ्या 24 तासांत घरवापसी; पुन्हा शिवसेनेत प्रवेश