धाराशिव : आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. विविध क्षेत्रात यश मिळवत आहे. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी अत्यंत मेहनतीने आपला हॉटेल व्यवसाय सुरू केला आणि मागील 14 वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. तसेच या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून दिवसाला 45 हजार रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
मीरा देवळकर असे या महिलेचे नाव आहे. जवळपास 14 वर्षांपूर्वी मीरा देवळकर यांनी वालवाडच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर हळूहळू त्यांनी शेव चिवड्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचे पती चांगदेव देवळकर, मुलगा मनोज देवळकर यांच्या मदतीने त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यांच्या हॉटेलमध्ये शेव चिवडा, जिलेबी, वडापाव, भजे, आणि भेळ मिळते.
गेल्या 14 वर्षांपासून वालवडच्या आठवडी बाजारात ते शेवचिवड्याचे हॉटेल लावतात. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला 7 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती आणि आता चक्क दिवसाकाठी 40 ते 45 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. या शेव चिवड्याच्या हॉटेलचे श्रेय चांगदेव देवळकर यांच्या पत्नी आणि मनोज देवळकर यांची आई मीरा देवळकर यांना जाते.
केंद्रीय अर्थसंकल्पातील ती घोषणा अन् सोन्याचे दर उतरले, छत्रपती संभाजीनगरमध्ये आता काय भाव?
मीरा देवळकर यांनी संघर्षातून हा व्यवसाय उभा केला आहे. आठवड्यातून तीन आठवडी बाजारात ते त्यांची हॉटेल लावतात. यामध्ये सोमवारी वालवड, मंगळवारी अनाळा, आणि शुक्रवारी पाथरूड येथील बाजारात ते आपली हॉटेल लावतात. तसेच प्रत्येक आठवडी बाजारात सरासरी 40 ते 45 हजार रुपयांची उलाढाल होते. तसेच शेव चिवड्याच्या हॉटेलच्या माध्यमातून याठिकाणी तीन कामगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
मीरा देवळकर यांनी भाजीपाला विकून व शेतातील तूर विकून आलेल्या पैशातून हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेल व्यवसायासाठी त्यांना पती व मुलगा यांची मोलाची साथ मिळत आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.





