TRENDING:

Dharashiv News : एकेकाळी केलं बिगारी काम, आज स्वतःच्या व्यवसायातून महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, VIDEO

Last Updated:

Dhrashiv News - अंगी मेहनत आणि जिद्द असेल तर व्यक्ती आयुष्यात नक्कीच प्रगती करू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. एकेकाळी बिगारी काम करणारा हा तरुण आता एक व्यवसायिक झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव - अंगी मेहनत आणि जिद्द असेल तर व्यक्ती आयुष्यात नक्कीच प्रगती करू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. एकेकाळी बिगारी काम करणारा हा तरुण आता एक व्यवसायिक झाला आहे. तसेच आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून हा तरुण आज महिन्याकाठी लाखोंची उलाढाल करत आहे. आज जाणून घेऊयात, या तरुणाची यशस्वी कहाणी.

advertisement

बाळासाहेब सुर्वे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी 6 वर्ष मिस्तरीच्या हाताखाली काम केले. त्यावेळी त्यांना 500 रुपये रोजंदारीने मिळायचे. बिगारी म्हणून ते काम करीत होते. बिगारी कामगार म्हणून काम करताना त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी धडपडही सुरू केली. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे भांडवलाची अडचण निर्माण होत होती.

advertisement

अखेर त्यांनी मित्रांच्या मदतीने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि पेव्हिंग ब्लॉकचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढला. त्यात त्यांनी कामगार वाढवले. आता त्यांच्याकडे सहा ते सात कामगार काम करतात. तर महिन्याकाठी आपल्या या व्यवसायातून ते अडीच ते 3 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

पावसात सोयाबीनची छाटणी करावी की नाही, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला अत्यंत महत्त्वाचा सल्ला, VIDEO

advertisement

एकेकाळी बिगारी कामगार म्हणून मिस्तरीच्या हाताखाली काम करणाऱ्या बाळासाहेब सुर्वे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाची भरभराट होत गेली. लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि व्यवसायातून चार पैसे शिल्लक राहत गेले. त्यामुळे आणि आयुष्य बदलून गेले. बिगारी कामगार म्हणून काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला. आता त्यांच्या पेव्हिंग ब्लॉकच्या निर्मितीच्या व्यवसायाची वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होत आहे. 500 रुपये रोजंदारीने काम करणारा कामगार ते आज यशस्वी व्यावसायिक अशा या तरुणाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : एकेकाळी केलं बिगारी काम, आज स्वतःच्या व्यवसायातून महिन्याकाठी लाखोंची उलाढाल, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल