TRENDING:

वडिलांच्या निधनाचं दु:ख गटागटा गिळलं, धाराशिवचे मैनाक घोष अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला

Last Updated:

मागील काही दिवसांपासून धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही दिवसांपासून धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरूर संसार रस्त्यावर आला आहे. अन्न पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशात एक जिल्हा परिषदेचा अधिकारी मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर परतले आहेत.
News18
News18
advertisement

वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारत ते दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मैनाक घोष असं संबंधित अधिकाऱ्याचं नाव आहे. ते धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

वडिलांचे अवघ्या एका दिवसापूर्वी निधन झाले. अंत्यविधी उरकून दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांची मदत आणि सरकारी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ मैनाक घोष हे फिल्डवर उतरून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देत आहेत. एवढेच नाही तर ते प्रशासनाच्या उपाययोजना देखील करत आहेत. वडिलांच्या अंत्यविधीनंतर त्यांना वडगाव सिद्धेश्वर येथील गावकऱ्यांनी पाझर तलावाची पातळी धोक्याची झाली असल्याची माहिती दिली.

advertisement

यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या मनात वडील गेल्याचे दुःख दाबून ठेवत, त्यांनी प्रशासनाच्या कार्याला व गावकऱ्यांच्या सुरक्षेला महत्त्व दिल्याने मैनाक घोष यांच्या कर्तव्यदक्षपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
वडिलांच्या निधनाचं दु:ख गटागटा गिळलं, धाराशिवचे मैनाक घोष अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल