मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी पुणे आणि मुंबईतून प्रत्येकी 20 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
पुणे-नागपूर प्रवाशांसाठी खुशखबर! लवकर सुरु होणार नवीन एक्सप्रेस गाडी; थांबे एकदा पाहाच
नागपूर-पुणे-नागपूर
गाडी क्रमांक 01209 नागपूर ते पुणे: ही गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर 2025२ या कालावधीत दर शनिवारी नागपूर येथून सुटेल. नागपूर स्टेशनवरून ही विशेष गाडी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.
advertisement
गाडी क्रमांक 01210 पुणे ते नागपूर: 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात ही विशेष गाडी प्रत्येक रविवारी पुण्यातून सुटेल. ही गाडी पुणे स्टेशनवरून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. या दोन्ही ट्रेन उरळी, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर (अहमदनगर), बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, वर्धा या स्टेशन्सवर थांबतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस
गाडी क्रमांक 02139 लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर: 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात प्रत्येक गुरुवारी ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन धावेल. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ही गाडी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी नागपूरच्या दिशेने निघेल.
गाडी क्रमांक 02140 नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस: 26 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात प्रत्येक शुक्रवारी ही गाडी नागपूरहून धावेल. ही ट्रेन दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघेल. या ट्रेन ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, वडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशन्सवर थांबतील.