डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. यावेळी घटनास्थळाची पाहणी करत काही गोष्टी तपासासाठी ताब्यात घेतल्या. पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांची एक चिठ्ठीदेखील सापडली. त्यामध्ये त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले.
प्रामाणिकपणाचा आग्रह जीवावर बेतला?
स्थानिक रुग्णालयातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी डॉ. वळसंगकर सतत आग्रही होते. सर्व व्यवहार कागदोपत्रांवर व्हावेत, असा त्यांचा स्पष्ट आग्रह होता. मात्र, काही कर्मचारी रुग्णांकडून उपचारासाठी पैसे स्वीकारत असताना कोणतीही नोंद ठेवली जात नव्हती. या प्रकाराला डॉ. वळसंगकरांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याला कामावरून हटवलं होतं. यानंतर संबंधित महिलेने आत्महत्येची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला गेला होता, परंतु डॉ. वळसंगकरांनी तो नाकारला. या संपूर्ण प्रकारामुळे डॉक्टर तणावात होते, आणि याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, अशीही चर्चा आहे.
राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारे घटना सोलापुरात शुक्रवारी रात्री घडली. सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या पिस्तूलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. डॉ. वळसंगकर यांनी आतापर्यंत मेंदू विषयी हजारो रुग्णांना जीवदान देण्याचं काम केलं आहे. मेंदू विषयातील तज्ञ म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर देशात नाव होतं. डॉ. वळसंगकर यांनी स्वतः गोळी झाडून का आत्महत्या केली याचा तपास सोलापूर शहर पोलीस करत आहे.