छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत दर महिन्याला राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांचा नवीन प्रकल्प उभारण्याचा आणि कोट्यवधींची गुंतवणूक करण्याची घोषणा करीत आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व आणखी वाढत आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्याना ड्रीम होम एक्स्पोच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
Navratri 2025: कर्णपुऱ्यातील तुळजाभवानीच्या दर्शन वेळेत मोठा बदल, भाविकांसाठी विशेष निर्णय
कसा असेल ड्रीम होम एक्स्पो ?
होम एक्स्पो म्हणजेच गृहप्रदर्शन बीड बायपास येथील जबिंदा ग्राऊंडवर भरवण्यात येत आहे. अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या 300 पेक्षा जास्त गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. सर्व प्रकल्प रेरा नोंदणीकृत आणि टायटल क्लिअर आहेत. हा ड्रीम होम एक्स्पो चार दिवस सुरू असेल. सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी सुरू असेल. शिवाय, याठिकाणी पार्किंग आणि प्रवेश मोफत असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे म्हणाले, "क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो ही फक्त घर खरेदीची संधी नाही. तर भविष्यात प्रत्येकासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि योग्य निर्णय घेण्याचं ठिकाण आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा."
लाखांपासून ते कोटींपर्यंत पर्याय
ड्रीम होम एक्स्पोमध्ये वन बीएचकेपासून ते 5 बीएचके फ्लॅटस्, रो हाऊसेस, बंगले, प्लॉट्स असे असंख्य पर्याय उपलब्ध असतील. व्यापारी, उद्योजकांसाठी विविध भागांतील व्यावसायिक प्रकल्पात ऑफिसेस, शोरुम्सही उपलब्ध असणार आहेत. या प्रॉपर्टीच्या किंमती 10 लाखांपासून ते 3 कोटी 50 लाखांच्या दरम्यान असतील.