TRENDING:

अमेरिका-इराणचं युद्ध सुरू असतानाच केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Last Updated:

Central Government : अमेरिका-इराण युद्धाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. तसेच भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. अशा आंतरराष्ट्रीय संकटांचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : अमेरिका-इराण युद्धाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. तसेच भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. अशा आंतरराष्ट्रीय संकटांचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य आर्थिक धक्क्यांना तोंड देण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा ‘आर्थिक स्थिरीकरण निधी’ उभारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. ही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.
Economic Stabilization Fund
Economic Stabilization Fund
advertisement

आर्थिक धक्क्यांच्या संरक्षणासाठी निधी

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, हा प्रस्तावित निधी जागतिक संकटांच्या काळात देशासाठी ‘सुरक्षा कवच’ म्हणून काम करेल. अचानक निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी किंवा आंतरराष्ट्रीय तणावामुळे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल. यामुळे देशाला आर्थिक व्यवस्थापनात अधिक लवचिकता मिळेल.

त्यांनी शेतकऱ्यांनाही दिलासा देत सांगितले की, देशात खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही. खतांच्या पुरवठ्यासाठी सरकारने आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

लोकसभेत पुरवणी मागण्या मंजूर

दरम्यान, लोकसभेत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदानाच्या पुरवणी मागण्यांचा दुसरा संच आणि विनियोग विधेयक मंजूर करण्यात आले. या मंजुरीमुळे केंद्र सरकारला अतिरिक्त खर्च करण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे सरकारला सुमारे 2.01 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याचा अधिकार मिळाला आहे.

वित्तीय शिस्त कायम ठेवण्यावर भर

advertisement

सीतारामन यांनी सांगितले की केंद्र सरकार वित्तीय शिस्तीचे काटेकोर पालन करत आहे. 2025-26 या वर्षासाठी ठरवलेल्या सुधारित अंदाजांच्या मर्यादेतच वित्तीय तूट ठेवली जाईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

अतिरिक्त खर्चाचा मोठा भाग विविध मंत्रालयांनी केलेल्या बचतीतून तसेच महसुलात झालेल्या वाढीतून भागवला जाईल. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा अतिरिक्त भार पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमेरिका-इराणचं युद्ध सुरू असतानाच केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल