TRENDING:

Eknath Khadse : मोठी बातमी! भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Last Updated:

Eknath Khadse : भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत बाग, प्रतिनिधी
भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा
भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा
advertisement

मुंबई, 24 ऑगस्ट : भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील भोसरी येखील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना यांचा अंतरीम दिलासा कायम ठेवला आहे. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्या प्रकरणी गोत्यात आलेले एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ACB नं दाखल केलेल्या गुन्ह्यात 29 ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.

advertisement

काय आहे प्रकरण?

पुण्यातील पुण्यातील भोसरी येथे मोठा भूखंड घोटाळा पुढे आला होता. यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचे नाव पुढे आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन कोर्टात याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अटकेची टांगती तलवार खडसे यांच्यावर होती. दरम्यान, याआधी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली होती. न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांचा अंतरिम जामीन 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला. नियमित जामीन अर्जावर निकाल येईपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला होता.

advertisement

वाचा - भाजप शिर्डी लोकसभा रामदास आठवलेंसाठी सोडणार? भाजप नेत्याने दिले संकेत

भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होणार अशी चर्चा होती. या निर्णया विरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणात सहकार्य करणार आणि चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, एकनाथ खडसे यांनाही दिलासा देत कोर्टाने त्यांना देखील जमीन मजूर केला होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse : मोठी बातमी! भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल