राज्यात शिवसेना आणि उबाठा या पक्षात संघर्ष सुरू असताना, कोकणात मात्र नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एक गु्प्त बैठकही पार पडली आहे. कणकवली शहर विकास आघाडी या नावानं ही बैठक झाली .
advertisement
नारायण राणेंनी व्यक्त केला संताप
दोनच दिवसांपूर्वी सिंधुदु्र्गात नितेश राणे यांनी स्वबळाची भाषा केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कणकवलीतील माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंनी संताप व्यक्त केला आहे.
सत्ता मिळवण्यासाठी रणनीती
कणकवली नगरपंचायतीवरील सत्ता ही राणे कुटुंबीय तसेच ठाकरेंच्या वैभव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी ही रणनीती आखल्याचं बोललं जातं आहे.
कोकणात दोन्ही शिवसेनेत युती होणार की नाही?
तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यानंतर या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यात विस्तवही जात नाही. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्यात...या पार्श्वभूमीवर राजकारणात कधी काय घडेल याची शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर कोकणात दोन्ही शिवसेनेत युती होणार की नाही याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल..
