Soybean Price : सोयाबीनच्या दराबाबत मोठी अपडेट, जालन्यात मिळाला विक्रमी 6200 रुपये दर, आणखी भाव वाढणार?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मागील दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी हवालदिल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक वाण अक्षरशः धुमाकूळ घालतेय.
जालना : सोयाबीन हे मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील शेतकऱ्यांसाठी देखील मागील काही वर्षांत प्रमुख कॅश क्रॉप म्हणून पुढे आले आहे. परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी हवालदिल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक वाण अक्षरशः धुमाकूळ घालतेय. तब्बल 6, 200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर या वाणाला मिळतोय. पाहुयात विक्रमी दर मिळणारं हे वाण कोणता आहे आणि काय आहे त्याची खासियत.
सर्वसाधारण सोयाबीनला बाजारात 3500 ते 4400 प्रतिक्विंटल असा दर मिळत असताना या वाणाला 6200 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर जालना बाजार समितीत मिळत आहे. विस्तारा नावाचं हे सोयाबीनचे नवीन वाण असून याची बाजार समितीमध्ये मर्यादित आवक आहे.
advertisement
जालना शहरातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 25 ते 30 हजार क्विंटल एवढी आवक दररोज होत आहे. सोयाबीनचा दर हा 3500 ते 4400 प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. तर ग्रीन गोल्ड या वाणाला 4500 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे.
जालना बाजार समितीमध्ये मागील दोन दिवसांपासून एकाच वाणाची चर्चा आहे. ते म्हणजे विस्तारा हे वाण. बीज उत्पादक कंपन्या या वाणाची चढ्या दराने खरेदी करत आहेत. 5500 प्रतिक्विंटल ते 6,200 प्रतिक्विंटलने या सोयाबीनची बाजार समितीमध्ये विक्री होत आहे. परंतु या वाणाची आवक केवळ 100 ते 125 कटी एवढीच असल्याचे पाहायला मिळतं. भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
जालन्यातील वझर येथील एका शेतकऱ्याने या वाणाची लागवड केली होती. त्यांच्या सोयाबीनला 6100 प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनचे हे वाण फार वाढणार नसून तीन ते चार दाणे असलेल्या शेंगा येणार आहेत. मला एकरी 21 कट्टे सोयाबीन झालं, असं वझर येथील शेतकऱ्याने सांगितलं.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 08, 2025 10:04 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Price : सोयाबीनच्या दराबाबत मोठी अपडेट, जालन्यात मिळाला विक्रमी 6200 रुपये दर, आणखी भाव वाढणार?

