Indian Railway Fact : रेल्वे रुळांमध्ये खडीच का टाकली जाते, सिमेंट का नाही? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
यामागे कोणतीही जुनी परंपरा नसून एक अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग, रुळांमधल्या या खडीचं रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया.
रेल्वेने प्रवास करताना आपण खिडकीतून बाहेर बघितलं की रेल्वेचे रूळ आणि त्याखाली पसरलेली काळी-पांढरी खडी आपल्याला हमखास दिसते. पण कधी विचार केलाय का, की जग इतकं प्रगत झालंय, आपण सिमेंटचे रस्ते आणि मोठमोठे फ्लायओव्हर बांधतो, मग रेल्वे रुळांच्या बाबतीत अजूनही आपण त्या जुन्या खडीचाच वापर का करतो? तिथं मस्त सिमेंटचं गुळगुळीत प्लॅटफॉर्म का बनवलं जात नाही?
advertisement
advertisement
advertisement
हजारो टन वजनाचा भार सोसण्यासाठीएक रेल्वे इंजिन आणि त्याचे डबे आणि त्यात लाखो लोक, हे सगळं मिळून हजारो टन वजन असतं. जेव्हा ही ट्रेन वेगाने धावते, तेव्हा रुळांवर प्रचंड दाब येतो. हे वजन पेलण्यासाठी रुळांखाली सिमेंटचे आडवे खांब (Sleeper) असतात. ही खडी या सिमेंटच्या खांबांना आपल्या जागेवरून हलून देत नाही. जर तिथे सिमेंट केलं, तर ट्रेनच्या वजनामुळे त्याला तडे जाऊ शकतात आणि त्यानंतर सिमेंट तूटून रुळ जागेवरुन हललं असतं, ज्यामुळे खूप मोठा अपघात झाला असता, पण दगड हा भार विभागून घेतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









