TRENDING:

Eknath Shinde : जी भीती ठाकरेंसह विरोधकांना, तीच शंका शिंदेच्या मनात! कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे आदेश

Last Updated:

Eknath Shinde : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
यवतमाळ: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्या मुद्यावरुन राज्यातला विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मु्द्याची धास्ती उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना असल्याची दिसून आले आहे.
जी भीती ठाकरेंसह विरोधकांना, तीच शंका शिंदेच्या मनात! कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे आदेश
जी भीती ठाकरेंसह विरोधकांना, तीच शंका शिंदेच्या मनात! कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे आदेश
advertisement

देशभर मतदार याद्यांमधील अनियमितता आणि बोगस मतदारांविरोधात आरोपांचा भडिमार सुरू असताना, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही या मुद्द्यावर गंभीर भूमिका घेतली आहे. बोगस मतदारांचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. विशेष म्हणजे महाविकास आघाडी, विरोधकांकडून बोगस मतदारांबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर स्वत: त्यांनी बोगस मतदारांबाबत भाष्य केल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना स्पष्ट देत मतदार याद्यांची काटेकोरपणे पडताळणी करून बोगस मतदारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळ येथे झालेल्या ‘शिवसंकल्प’ जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री संजय राठोड आदींची उपस्थिती होती. खराब हवामानामुळे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला होता.

advertisement

मतदार यादीत काटेकोर तपासणीचे आवाहन

एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “मतदार याद्यांतील घोळाबाबत चर्चा सुरू आहे. प्रत्येक शिवसैनिकाने दक्ष राहून बोगस मतदारांची नावे मतदारयादीत राहणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या हक्काच्या मतदारांचे नाव मतदार यादीत येईल, याची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले. यासाठी पक्षाने विकसित केलेल्या ‘लक्ष्यवेध’ अॅपचा वापर करून निवडणुकीची हायटेक तयारी करण्याचे त्यांनी म्हटले.

advertisement

महायुतीची एकत्रित निवडणूक रणनिती

शिवसेना महायुतीसोबत आगामी निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट करताना शिंदे म्हणाले, “एकत्र संसारात कुरबुरी होतातच, पण एक पाऊल आम्ही मागे आणि एक पाऊल ते मागे अशा समजुतीनेच पुढे जायचे आहे. विरोधकांना हरवायचे, मित्रांना नव्हे.” मित्रपक्षांसोबत समन्वय राखला नाही तर परिस्थिती बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

काम करणाऱ्यांनाच महामंडळात संधी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महामंडळावरील नियुक्तीबाबत भाष्य केले. या निवडणुकांनंतरच राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या ठरवण्यात येतील आणि निवडणूक काळात निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : जी भीती ठाकरेंसह विरोधकांना, तीच शंका शिंदेच्या मनात! कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल