गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना सर्दी खोकला तापाचा आजार झाला होता. त्यातून ते बरे झाले. मात्र, आजाराच्या परिणामी त्यांना अजून थोडा थकवा जाणवत आहे. नियमित वैद्यकीय चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है ज्युपिटर हॅास्पिटल येथे दाखल झाले आहे.
एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरीयाची चाचणी करण्यात आली आहे.या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मात्र शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांच्यावरती उपचार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या तापामुळे अॅटीबायोटीक्सचे उपचार सूरू आहे. तसेच सतत येणाऱ्या तापामुळे त्यांना अशक्तपणा येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील वैद्यकीय उपचारांच्या चाचण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महायुतीची बैठक टळली?
आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार होती. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे वृत्त होते. मात्र, आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तर, दुसरीकडे अजित पवार हेदेखील दिल्लीत आहेत.
