एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शहरातील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. अभिनेत्री राखी सावंत हिने पाकिस्तानचा जय केल्याचा प्रश्न गायकवाड यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना थेट तिला गोळ्या घाला, असे गायकवाड म्हणाले.
इथे गोळ्या घाला आणि पाकिस्तानात गाडा
राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत. राखी सावंतसारखी महिला ही महिलांच्या नावावर कलंक आहे. राखी सावंत ही भारतात पैसे कमावते, भारतात खाते, भारतात आराम करते आणि विरोधी देशाच्या जयजयकाराचा नारा देते, तिला तिकडेच गाडले पाहिजे. तिला भारतात येऊ देता कामा नये, असे संजय गायकवाड म्हणाले.
advertisement
राखी सावंत काय म्हणाली होती?
माझं नाव अभिनेत्री राखी सावंत. मी नेहमी खरे बोलते, खोटे बोलत नाही. पाकिस्तानी लोकांना मी तुमच्या सोबत आहे. जय पाकिस्तान, असा व्हिडीओ पहलगाम हल्ल्यानंतर व्हायरल झाला होता. पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची बाजू घेण्याऐवजी पाकिस्तानची बाजू घेतल्याने तिला देशद्रोही म्हणत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली.
संजय गायकवाड कोण आहे?
संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत
बुलढाणा शहर मतदारसंघातून ते आमदार झाले आहेत
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी निसटत्या मतांनी ते विजयी झाले आहेत
संजय गायकवाड हे सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात
राहुल गांधी यांची जीभ छाटा, असे वक्तव्य त्यांनी मध्यंतरी केले होते
सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांना समजही दिली होती
