हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केला. पहाटे सहा वाजता त्यांच्या निवासस्थानी तब्बल शंभर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. बांगर यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे नाव घेता टीकास्त्र सोडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस २८ नोव्हेंबर रोजी हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत. त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत. कळमनुरीत बांगर यांनी भाजपविरोधात शिंदे गटाचा स्वबळावर उमेदवार उभा केला आहे,
advertisement
सकाळी सहा वाजता शंभर पोलीस घराच्या आवारात...
आमदार बांगर म्हणाले, “पहाटे सहा वाजता सर्वजण झोपलेले असताना माझ्या घरासमोर शंभर पोलिसांचा ताफा उभा राहिला. घराची झाडाझडती घेतली. कपाटं, कपडे, फ्रिजमधील साहित्य, सगळं सामान बाहेर काढलं. घरासमोर छावणी उभारल्यासारखी स्थिती होती. त्यांनी पुढे म्हटले की, “पोलीस प्रशासनावर दबाव आणून एखाद्या सत्ताधारी विरोधकाच्या घराची झडती घेतली जात असेल, तर हे लोकशाहीला घातक असल्याचे बांगर यांनी म्हटले.
नातेवाईकांना नोटिसा देणं सुरू....
बांगर यांनी आरोप करत सांगितलं की, त्यांच्या नातेवाईकांना नोटिसा देण्याचे प्रकार सुरू आहेत. हे राजकीय सूडाचे राजकारण आहे,” असा दावा करत त्यांनी कारवाई मागे कोणाचा दबाव आहे हे सर्वांना माहित असल्याचं सुचवलं.
शिंदे-गट भाजपात आरोप प्रत्यारोप...
संतोष बांगर हे अवैध धंदे करतात असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हिंगोली पोलीस आमदार बांगर यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आमदार मुटकुळे म्हणाले होते. या आरोपानंतर हिंगोली पोलिसांच्या पथकाने संतोष बांगर यांचे निवासस्थान असलेल्या वंजारवाडा भागात छापा टाकत घराची झडती घेतली. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या टायमिंगची चर्चा सुरू झाली आहे.
