एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील घरातून पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिंदेंसोबत त्यांच्या निवासस्थानी प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पदावरून सध्या एकनाथ शिंदे याच्याकडून दबाव तंत्र सुरु आहे. या सर्व घडामोडी सूरू असताना शिंदेंनी आता निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी मौन सोडलं आहे.
Maharashtra Govt Formation : PM मोदी-शाह सोबत काय बोलणं झालं, एकनाथ शिंदेंनी शब्द न् शब्द सांगितला
advertisement
मुख्यमंत्री पदाच कुठेही घोडं अडलेलं नाही. आणि मी कुठेही ताणून ठेवणारा नाही आहे.तसेच माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. माझ्या भावना मी त्यांना सांगितल्या आहेत. तसेच सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीची अडचण होणार नाही. आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.
दरम्यान आज कोणतीही कोंडी राहू नये यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे. आम्ही नाराज होऊन बसणारे लोक नाही लढणारे लोक आहेत. जीव तोडून आम्ही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करणार आहे.त्यामुळे महायुती मधील कोणीही मुख्यमंत्री बनवेल त्यांना शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना मान्य असेल,असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
