Maharashtra Govt Formation: PM मोदी-शाह सोबत काय बोलणं झालं, एकनाथ शिंदेंनी शब्द न् शब्द सांगितला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Press Conference on Mahayuti Government Formation: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाणे : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला आहे. भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले होते. या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काय बोलणं झालं? हे देखील पत्रकार परिषदेत सांगितले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले?
मला काय मिळालं या पेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं यात माझा आनंद आहे. बहिणींना पैसे मिळाले. औषध, फीचे पैसे मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये जनतेचं प्रेम मिळालं, त्यांना वाटतं जनतेला मुख्यमंत्री आहे. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळाली, याला खूप नशीब लागतंय. लोकप्रिय मुख्यमंत्री माध्यमांनीच ओळख दिली. मी जनतेसाठी काम केलं.
advertisement
राज्याला पुढे जायचं असेल तर केंद्राची ताकद आपल्यासोबत आहे. केंद्राची मदत कायम लागणार आहे. आता राज्यात जे काही बहुमत मिळालं आहे. कुठे घोड आडलं आहे, मी काहीही धरू ठेवलं नव्हतं. कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ पद मिळालं आहे.
मी काल पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितलं सरकार बनवताना कोणती अडचणीचं काही आहे तर माझ्यामुळे कुणामुळे तर कधी मनात आणू नका. अडीच वर्ष संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीएचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय मान्य असेल. माझ्यामुळे सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना एकनाथ शिंदेची अडचण होणार नाही. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल हे मला आणि शिवसेनेला मान्य असेल.
advertisement
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
November 27, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation: PM मोदी-शाह सोबत काय बोलणं झालं, एकनाथ शिंदेंनी शब्द न् शब्द सांगितला


