उदय सामंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.या प्रतिक्रियेत बोलनाता उदय सामंत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंसाठी दिलेले पत्र राजभवनावर घेऊन जातोय. उपमुख्यमंत्रीपदाच हे पत्र आहे. हे पत्र आम्ही राजभवनावर घेऊन चाललोय. आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले आहे.
गृह खातं सोडा, आता नगरविकास खातंही जाणार? भाजपचे एकनाथ शिंदेंवर दबावतंत्र
advertisement
दरम्यान शिंदेंची वर्षावर भेट घेण्यापूर्वी उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, हे आमची कायमची भूमिका आहे. तसेच आमच्यामधून कुणाच्याही मनात उपमु्ख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसाव अशी इच्छा नाही. शिंदे सोडून मुख्यमंत्री होण्यास कुणीच इच्छुक नाही आहे. त्यामुळे आमचं करिअर आता शिंदेंच्या हातात, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं,अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.तसेच येत्या अर्धा किंवा तासाभरात शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? यावर स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
जर आम्ही दबावाचे राजकारण करतोय, असे जर वाटत असेल तर एकनाथ शिंदे यांनी दोनदा त्यांची भूमिका जाहीर करणार नाही. त्यामुळे या सगळ्या बातम्यांमध्ये काहीएक तथ्य नाही,असे सामंत यांनी म्हटले आहे.
'...तर आम्ही मंत्रिपद स्विकारणार नाही', शिंदेंनंतर आता आमदाराची टोकाची भूमिका
दरम्यान या सर्व घडामोडीनंतर वर्षावर संजय शिरसाट उदय सामंत भरत गोगावले दाखल झाले होते.वर्षावर हे नेते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
