Uday Samant : '...तर आम्ही मंत्रिपद स्विकारणार नाही', एकनाथ शिंदेंनंतर आता आमदाराची टोकाची भूमिका

Last Updated:

Maharashtra CM Oath Ceremony :महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. तरी देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.


Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Oath Ceremony : सुस्मिता भदाने-पाटील, मुंबई : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. तरी देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. त्यात आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नाही झाले तर आम्ही देखील मंत्रिपद स्विकारणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांचे आमदार उदय सामंत यांनी केली आहे.
उदय सामंत माध्यमांशी बोलत होते.यावेळी सामंत म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, हे आमची कायमची भूमिका आहे. तसेच आमच्यामधून कुणाच्याही मनात उपमु्ख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसाव अशी इच्छा नाही. शिंदे सोडून मुख्यमंत्री होण्यास कुणीच इच्छुक नाही आहे. त्यामुळे आमचं करिअर आता शिंदेंच्या हातात, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं,अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे.तसेच येत्या अर्धा किंवा तासाभरात शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? यावर स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मोठी बातमी! भाजप गृह खातं सोडणार? शिंदेंच्या मागणीबाबत समोर आली अपडेट...
जर आम्ही दबावाचे राजकारण करतोय, असे जर वाटत असेल तर एकनाथ शिंदे यांनी दोनदा त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या बातम्यांमध्ये काहीएक तथ्य नाही,असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या सर्व घडामोडीनंतर वर्षावर संजय शिरसाट उदय सामंत भरत गोगावले दाखल झाले होते.वर्षावर हे नेते एकनाथ शिंदे यांची मनधरणी करणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement

11 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार 

खरं तर आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे.यात शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 डिसेंबर 2024 ला होणार आहे. असाच दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी देखील केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uday Samant : '...तर आम्ही मंत्रिपद स्विकारणार नाही', एकनाथ शिंदेंनंतर आता आमदाराची टोकाची भूमिका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement