Eknath Shinde Devendra Fadnavis : मोठी बातमी! भाजप गृह खातं सोडणार? शिंदेंच्या मागणीबाबत समोर आली अपडेट...

Last Updated:

Eknath Shinde Devendra Fadnavis : महायुतीच्या नव्या सरकारमध्ये आपल्याला गृह खातं मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. गृह खात्यासह त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती.

मोठी बातमी!  भाजप गृह खातं सोडणार? शिंदेंच्या मागणीबाबत समोर आली अपडेट...
मोठी बातमी! भाजप गृह खातं सोडणार? शिंदेंच्या मागणीबाबत समोर आली अपडेट...
अजित मांढरे, प्रतिनिधी,  मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी पार पडणार आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये आपल्याला गृह खातं मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. गृह खात्यासह त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या मागणीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

गृह खाते भाजप सोडणार?

एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह खात्याची मागणी केली होती. आता, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांने सांगितले की, आजच्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ⁠एकनाथ शिंदे यांनी मागणी केलेल्या खात्यांबाबत भाजपा पक्ष श्रेष्ठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. ⁠गृहखाते शिवसेनेला देण्याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठींनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितली. ⁠मात्र गृह खात्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
advertisement

आमच्या पक्षाचा मान ठेवावा...

बुधवारी, रात्रीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी याच विषयावर एकनाथ शिंदे यांच्याशी जवळपास पाऊणतास चर्चा केली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मागण्या फडणवीस यांच्यासमोर ठेवल्या. ⁠गृह खात्यासोबतच महसूल खाते, नगरविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते मिळावीत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. ⁠तर, मुख्यमंत्रीनंतरचे दोन नंबरचे पद हे उपमुख्यमंत्री असते. त्याला साजेशी खाती द्यावीत अशी मागणी शिवसेनेने भाजपाकडे केली आहे. ⁠शिवसेना राज्यातील 2 नंबरचा मोठा पक्ष आहे. त्याचा, मान राखावा असं शिवसेनेने भाजपा श्रेष्ठींना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाकडे असलेल्या खात्यांमुळे आम्हाला मंत्रीमंडळात देखील दोन नंबरचे स्थान मिळावी ही माफक अपेक्षा असल्याचेही शिवसेनेच्या नेत्याने सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Devendra Fadnavis : मोठी बातमी! भाजप गृह खातं सोडणार? शिंदेंच्या मागणीबाबत समोर आली अपडेट...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement