Maharashtra CM Oath Ceremony : तीन जणांचा आज शपथविधी, मग मंत्रिमंडळ विस्तार कधी? भरतशेठ गोगावलेंनी तारीखच सांगितली?

Last Updated:

Maharashtra CM Oath Ceremony : खरं तर आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे.


Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यामुळे आज फक्त तिघांचा शपथविधी पार पडणार आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. यावर आता महायुतीतील नेतेच वेगवेगळ्या तारीख सांगत बसले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आमदार अनिल पाटील यांनी वेगळी तारीख सांगितली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आणखी वेगळी तारीख सांगितली आहे.
खरं तर आझाद मैदानावर आज फक्त तीन नेत्यांचाच शपथविधी पार पडणार आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांनी होणार आहे.यात शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 डिसेंबर 2024 ला होणार आहे. असाच दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी देखील केला आहे.
advertisement
आज तिघांचा शपथविधी होईल. पुढच्या दोन दिवसांत 7 आणि 8 डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर अधिवेशनाआधी इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल. तसेच कोणते मंत्री शपथ घेणार नाही हेच ठरल्यामुळे खातेवाटप हा पुढचा विषय आहे, असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
आज फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ थोडा कमी मिळाल्याने तिघाचा शपथविधी होईल. तसेच कोणाला किती खाती मिळतील याबाबत चर्चा होईल. योग्य खाती शिंदेसाहेब पक्षाकडे घेतील
advertisement
प्रत्येक पक्ष आप आपल्या परिने मागणी करतो. त्यामुळे शिंदेसाहेबांनी जे मागितलयं त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. काही गोष्ट भविष्यात चांगल्या करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातात, अशे गोगावलेंनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra CM Oath Ceremony : तीन जणांचा आज शपथविधी, मग मंत्रिमंडळ विस्तार कधी? भरतशेठ गोगावलेंनी तारीखच सांगितली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement