TRENDING:

NCP Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी जोरात वाजणार? चिन्हांबाबत आयोगाचा मोठा निर्णय

Last Updated:

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सूर बिघडवणाऱ्या ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवर अखेर बंदी घालण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सूर बिघडवणाऱ्या ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवर अखेर बंदी घालण्यात आली आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगानं नवे परिपत्रक काढत, ही दोन्ही मुक्त चिन्ह गोठवल्याचं जाहीर केलं आहे, त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी जोरात वाजणार? चिन्हांबाबत आयोगाचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी जोरात वाजणार? चिन्हांबाबत आयोगाचा मोठा निर्णय
advertisement

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत 10 पेकी 8 जागा जिंकल्या. पण, लोकसभेत पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीपेक्षाही अपक्ष उमेदवारांनीच जास्त हादरा दिल्याचं समोर आलं. त्याचं कारण अर्थातच तुतारीशी साम्य असणारी दोन चिन्ह, ती म्हणजे ट्रम्पेट आणि पिपाणी अर्थात तुतारी चिन्हं. पण, आता विधानसभेतही या दोन्ही चिन्हांमुळे पवारांच्या तुतारीचा सूर काही बिघडणार नाही. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढत ट्रम्पेट आणि तुतारी चिन्ह गोठवण्याची घोषणा केली आहे.

advertisement

महाराष्ट्र राज्यातील राज्य पक्षांच्या यातील आता 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' पक्षाचा समावेश करण्यात आला असून या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणार माणूस आहे.

लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसला होता. साताऱ्यात तर पिपाणीमुळे शशिकांत शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा पक्षानं केलेला. कारण शशिकांत शिंदेंना 5 लाख 38 हजार 363 मते मिळाली तर भाजपच्या उदयनराजेंना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. उदयनराजेंनी 32 हजार 771च्या मताधिक्यानं शिंदेंचा पराभव केला. पण, याच मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडेंनी तब्बल 37 हजार 62 मते घेतली. म्हणजे ही पिपाणीची 37 हजार 62 मते शशिकांते शिंदेंना मिळाली असती तर जवळपास 5 हजार मतांनी ते विजयी झाले असते.

advertisement

दिंडोरी, बीड, अहमदनगर दक्षिण आणि बारामतीतही मतदारसंघातील अपक्षांच्या तुतारी, पिपाणी चिन्हांनं पवारांच्या तुतारीचा आवाज काहीप्रमाणात दाबल्याचं पाहायला मिळालं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष बाबु भगरे यांनी 1 लाख 03 हजार 632 मते मिळवली. बीडमधे तर पिपाणी चिन्ह असलेले अशोक थोरात हे 54 हजार 850 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अहमदनगर दक्षिणमध्येही पिपाणी चिन्ह असलेल्या गोरख आळेकर यांना तब्बल 44 हजार 597 मते पडली. बारामतीत तुतारी चिन्हं असलेले अपक्ष उमेदवार शेख सोयलशाह यांनी 14 हजार 917 मते मिळवत सुळेंची आघाडी घटवली.

advertisement

लोकसभेत साधर्म्य असलेल्या चिन्ह आणि नावामुळे फटका बसणार हे उघड असल्यामुळेच निवडणुकीच्याआधी आणि निकालानंतरही राष्ट्रवादीनं या चिन्हांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता. पण, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी मान्य झाल्यामुळे विधानसभेआधी हा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

राज्य निवडणूक आयोगानं परिपत्रक काढत दोन्ही मुक्त चिन्ह गोठवली आहेत, त्यामुळे आता ही दोन्ही चिन्ह विधानसभेत दिसणार नाहीत. पण, पवारांच्या राष्ट्रवादीचं अजूनही पूर्ण समाधान झाल्याचं दिसत नाही, त्यामुळे आता राष्ट्रवादीची रणनीती नेमकी काय राहते? येत्या विधानसभा निवडणुकीत याचा कुणाला आणि किती फायदा मिळतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी जोरात वाजणार? चिन्हांबाबत आयोगाचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल