TRENDING:

निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरमध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडली, ते १ कोटी रुपये कुणाचे? कारवाईने खळबळ

Last Updated:

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरमध्ये वाहनात एक कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून १ कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरीश दिमोटे, प्रतिनिधी, संगमनेर :नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. अचानक सापडलेल्या या मोठ्या रकमेने शहरात खळबळ उडाली असून या पैशांचा नेमका स्रोत आणि तो कोणत्या उद्देशासाठी वापरला जाणार होता, याचा तपास वेगाने सुरू आहे.
संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
संगमनेरमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली. वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पुढील तपासात वाहनातून मोठी रोकड आढळताच पथकाने तत्काळ ती जप्त केली आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

advertisement

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, महागड्या वस्तू किंवा इतर साहित्य मतदारांपर्यंत पोहोचवून मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, अशी तक्रार आयोगाकडे अनेक वेळा नोंद होत असते. त्यानुसारच आयोगाने या निवडणुकीत विशेष पथके तैनात केली आहेत. संगमनेरमध्ये झालेली ही कारवाई देखील त्याच अनुषंगाने महत्त्वाची मानली जाते.

advertisement

१ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुणाची? कुठे जाणार होती?

संगमनेरमध्ये सापडलेली १ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुणाची होती आणि कुठे जाणार होती? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. या रकमेचा राजकीय व्यवहाराशी काही संबंध आहे का, किंवा ती इतर कोणत्या व्यवहारासाठी रक्कम वापरली जाणार होती का, याचा तपास निवडणूक आयोग, पोलिस विभाग आणि संबंधित तपास यंत्रणा करत आहेत.

advertisement

प्रत्येक वाहनावर 'करडी नजर'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी रोकड मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. निवडणूक आयोगाने शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर 'करडी नजर' ठेवण्याचे निर्देश दिले असून पुढील काही दिवस तपासणी अधिक कडक राहणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरमध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडली, ते १ कोटी रुपये कुणाचे? कारवाईने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल