TRENDING:

उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड, सहीने काढले बदल्यांचे आदेश; खळबळजनक प्रकारानंतर गृह विभाग अलर्ट

Last Updated:

उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करण्यात आल्याची माहिती गृह विभागाने परिपत्रक काढून दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड, सहीने काढले बदल्यांचे आदेश; खळबळजनक प्रकारानंतर गृह विभाग अलर्ट
उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड, सहीने काढले बदल्यांचे आदेश; खळबळजनक प्रकारानंतर गृह विभाग अलर्ट
advertisement

पुणे : उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटरहेड, सही आणि ईमेल बनवल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदली आदेशासाठी उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करण्यात आल्याची माहिती गृह विभागाने परिपत्रक काढून दिली आहे. याप्रकारानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. जीमेल आणि इतर खासगी मेलचा वापर शासकीय विभागांना करता येणार नाही, असे आदेश गृहविभागाकडून शासनाच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

advertisement

उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावांनी मेल आयडीवरून बनावट लेटरहेड, बनावट शिक्के आणि बनावट सहीच्या साहाय्याने उर्जा विभागाच्या 6 अभियंतांच्या बदलीचा आदेश तयार करण्यात आला. हा प्रकार कळाल्यानंतर गृहविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली, त्यानंतर गृहविभागाने सर्व विभागांसाठी हे सर्क्युलर काढलं आहे. शासनाच्या अधिकृत मेल आयडीवरूनच संवाद साधावा, असं गृहखात्याने सांगितलं आहे. गृहखात्याच्या सायबर विभागाने हे सर्क्युलर काढलं आहे.

advertisement

मागच्या काही काळापासून राज्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला, यानंतर त्याने स्वत:लाही गोळी झाडून संपवलं. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचाही मृत्यू झाला. चाळीसगावमध्येही भाजपच्या माजी नगरसेवकावर त्यांच्याच कार्यालयात घुसून अज्ञातांनी गोळीबार केला, यात त्यांचा मृत्यू झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातल्या गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवून त्यांना सज्जड दमही दिला. राज्यातल्या या गुन्हेगारीवरून विरोधक सरकारला लक्ष्य करत असतानाच आता उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटरहेड, ईमेल आणि सही बनवून बदल्यांचा आदेश काढल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड, सहीने काढले बदल्यांचे आदेश; खळबळजनक प्रकारानंतर गृह विभाग अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल