बुलढाणा : बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या बँक मॅनेजरवर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे. शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव आहे.
खामगाव तालुक्यातील जळका भडंगमधील किरण गायगोळ नावाचा शेतकरी त्याच्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता. या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली होती, त्यामुळे आपल्याला पैसे काढायला त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
advertisement
3 गोळ्या लागल्यानंतरही घोसाळकर अंगावर धावून गेले, मॉरिसच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं?
सकाळी 11 वाजल्यापासून हा शेतकरी बँकेत येऊन थांबला होता, पण शेतकरी बचत गटाता मूळ ठराव नसल्याचं कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात होता, त्यामुळे शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भोसकलं. या हल्ल्यात बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. बँक मॅनेजरला तातडीने खामगाव शहरातील सिल्व्हरसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
शेतकरी आणि बँक मॅनेजरमध्ये झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकरही जखमी झाले आहेत. आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेड, सहीने काढले बदल्यांचे आदेश; खळबळजनक प्रकारानंतर गृह विभाग अलर्ट
