TRENDING:

Beed: 'आजाराने छळलं होते, मरणाने केली सुटका'; सोन्यासारख्या पिकात विश्वानाथ यांना पाहून गाव हळहळलं

Last Updated:

विश्वनाथ पांचाळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : 'इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतील अजरामर वाक्य आजही कुठे वाचलं तर प्रत्येकाला अंतमुर्ख करायला भाग पाडते. एकीकडे बळीराजा हवामान आणि शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे हवालदील झाला आहे. तर दुसरीकडे, कुटुंबाचा गाडा आणि आजाराशी सामना करताना शेतकरी पुरता अडकून गेला आहे. आपल्या पाठीशी लागलेल्या आजारापासून धाव घेणाऱ्या एका शेतकऱ्याने सोन्यासारखं पिकवलेल्या शेतात स्वत: ला संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये घडली आहे.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात ही घटना घडली आहे. उसाच्या फडात लागलेल्या आगीमध्ये एका 60 वर्षीय वयोवृद्धचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

शेतात आग लागल्याची माहिती मिळताच लोकांनी शेताकडे धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना सरीमध्ये  विश्वनाथ पांचाळ यांचा जळालेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, विश्वनाथ पांचाळ हे गेल्या काही वर्षांपासून आजाराने ग्रस्त होते. आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, कोणताही फरक जाणवला नव्हता. त्यामुळे आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवारात खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: 'आजाराने छळलं होते, मरणाने केली सुटका'; सोन्यासारख्या पिकात विश्वानाथ यांना पाहून गाव हळहळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल