TRENDING:

Agriculture News : सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video

Last Updated:

उत्पादन वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि अन्नधान्याची गुणवत्ता सुधारणा करणे या दृष्टीने या दोन्ही पद्धतींचे वेगवेगळे महत्त्व आहे. मात्र सध्याच्या काळात आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : आजच्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती या दोन प्रकारांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. उत्पादन वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि अन्नधान्याची गुणवत्ता सुधारणा करणे या दृष्टीने या दोन्ही पद्धतींचे वेगवेगळे महत्त्व आहे. मात्र सध्याच्या काळात आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
advertisement

सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग करून पिकांची वाढ केली जाते. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते तसेच पर्यावरणालाही कमी हानी पोहोचते. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते.

एक एकरमध्ये केली लिंबाची लागवड, 26 वर्षांनंतरही होतोय फायदा, 80 लाख निव्वळ नफा

advertisement

दुसरीकडे रासायनिक शेतीमध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते, तणनाशके आणि कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या पद्धतीमुळे कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळते आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. हरित क्रांतीनंतर देशात अन्नधान्य उत्पादन वाढवण्यात रासायनिक शेतीने मोठे योगदान दिले आहे.

मात्र रासायनिक शेतीचे काही तोटेही समोर येत आहेत. सतत रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, पाण्याचे प्रदूषण वाढणे आणि अन्नामध्ये रासायनिक अंश राहण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

त्यामुळे आज अनेक कृषी तज्ज्ञ संतुलित शेती पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहेत. शक्य तितक्या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करून आवश्यक तेवढ्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन आणि पर्यावरण या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधता येऊ शकतो. भविष्यात टिकाऊ शेतीसाठी सेंद्रिय शेतीला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल