समोर आलेल्या माहितीनुसार, सतीश कोलपाकवार य हे जावयाचा अंत्यविधी आटोपून येत होते. या वेळी कारमध्ये पाच जण होते. आलापल्लीहून आष्टीकडे कारने परतताना दिना नदीवरील पुलावरून जात होते.
अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने तोल गेला आणि कार ही नदीत कोसळली . अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
advertisement
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले
या अपघातात यादव कोल्पाकवार (रा. आष्टी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुनील कोल्पाकवार (रा. आष्टी) यांना गंभीर अवस्थेत अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमध्ये प्रवास करणारे उर्वरित तीन जण गंभीर जखमी असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
पंचनामा करून अपघाताची नोंद
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीत कोसळलेल्या कारमधून जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
कोलपाकवार कुटुंबावर शोककळा
दरम्यान, दिना नदीवरील पुलाची अरुंद रचना, अपुरे संरक्षक कठडे आणि अपघाताची शक्यता लक्षात घेता पुलाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दुर्घटनेमुळे कोलपाकवार कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा :
