या दरम्यान दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांनी प्रकाश पठ्ठे आणि अमोल पठ्ठे यांना अश्लील शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या दोघांना जबर मारहाणही केली. या मारहाणीत ते दोघेही जखमी झाले असून यातील प्रकाश पठ्ठे यांना डोक्यावर विट मारण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी बुलडाणा येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
advertisement
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात रस्त्यावरच ही मारहाण चाललेली दिसत आहे. रस्त्यावरच चाललेल्या या भांडणाचा आसपास उभा असलेल्या लोकांनी व्हिडिओ काढला, जो व्हायरल झाला. विशेष यावेळी घटनास्थळावर पोलीस कर्मचारीसुद्धा असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तरीही हे लोक पोलिसांसमोर एकमेकांना मारहाण करत आहेत.
रस्त्याच्या कडेला भरपूर गर्दी झालेली होती. मात्र नागरिक फक्त बघ्यांची भूमिका घेत उभे होते. याप्रकरणी दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी 324, 294, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
