कर्जाची सुविधा मुंबई बँकेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. महिलांना दिलेले कर्ज दरमहा शासनाकडून मिळणाऱ्या मानधनातून हप्त्यांमध्ये परत करावे लागेल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहे. त्यामुळे या महिलांना व्यवसायासाठी कर्ज घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
वैयक्तिक आणि गट व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध
योजनेच्या माध्यमातून महिलांना वैयक्तिक तसेच गट व्यवसायासाठी कर्ज मिळण्याची संधी आहे. 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात आणि मिळालेल्या कर्जाचा वापर करून आपला व्यवसाय स्थापन करू शकतात. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल.
advertisement
या योजनेत कर्ज देण्याची जबाबदारी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केली जाईल. याशिवाय महिला आणि बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जाईल.
मुंबई बँकेत एकूण 16.07 लाख बचत खाती आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 53,357 महिलांच्या शून्य शिल्लक खात्यांची उभारणी करण्यात आली आहे. या खात्यांमध्ये दर महिना मानधन जमा केले जाते. यामुळे महिलांना त्यांच्या पैशावर थेट नियंत्रण मिळतो आणि ते व्यवसायासाठी कर्ज घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
या योजनेचा उद्देश फक्त कर्ज देणे नाही तर महिलांना व्यवसायिक जीवनात सक्षमीकरण करणे हा आहे. व्यवसाय सुरू केल्याने महिलांना नोकरीच्या निर्भरतेवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांना स्वतःच्या पैशावर काम करण्याची संधी मिळेल आणि आर्थिक स्थैर्य साधता येईल. एकूणच लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यवसाय कर्ज योजना महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मोठा पाऊल आहे. ही योजना महिला आणि बालविकास विभाग, मुंबई बँक आणि विविध महामंडळांच्या माध्यमातून कार्यान्वित केली जात आहे. 5 ते 1o महिलांची गटव्यवसाय संधी, कर्जाची परतफेड शासनाकडून मिळणाऱ्या मानधनातून करणे आणि 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा बळ मिळणार आहे.
या योजनेमुळे महिलांचा आर्थिक सक्षमीकरण साधले जाईल त्यांची समाजातील स्थिती सुधारेल आणि त्यांना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळेल. लाडकी बहीण योजनेच्या मानधनाखालील महिलांना व्यवसाय कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. हे कर्ज महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी मोठे योगदान देणार आहे.मुंबईत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी व्यवसाय कर्ज योजना